ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त खड्डे प्रश्नी अँक्शन मोडवर आले असून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सर्व प्रभागातील अभियंते व ठेकेदार यांची बैठक घेतली आणि कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्ती आणि खड्डे भरणीच्या कामाचा प्रभाग निहाय आढावा घेतला.
येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवसात जास्तीत जास्त मशिनरी आणि मनुष्यबळ वापरून रस्ते दुरुस्ती करावी, दिवसभर व रात्री या दोन्ही सत्रात काम करावे तसेच जास्त वाहतुकीचे,वर्दळीच्या ठिकाणी रात्रीचे वेळी काम करावे असे निर्देश त्यांनी सर्व प्रभागातील अभियंते आणि ठेकेदार यांना दिले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एखादी आपत्ती घडल्यास संबंधित ठेकेदारास ब्लॅक लिस्ट केले जाईल असाही इशारा त्यांनी या बैठकीचे वेळी दिला.
Post a Comment
0 Comments