ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांतील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत असून गणेशोत्वाआधी या समस्या सोडविण्याची मागणी भारतीय जनता पार्टीचे केडीएमसीचे माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी केली असून याबाबत त्यांनी केडीएमसी आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले आहे. गणेशोत्सवापूर्वी या समस्या न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील भोईर यांनी दिला आहे.
मागील काही वर्षांपासून महापालिका क्षेत्रामध्ये लोकप्रतिनिधी नाहीत. तर या भागातील सामाजिक समस्यांबाबत सर्वस्वी जबाबदारीही प्रशासक म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांची आहे. काही दिवसातच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सणांपैकी गणेशोत्सव हा महत्त्वाचा सण सुरू होत आहे. परंतू सध्या परिस्थितीत महत्त्वाच्या समस्या नागरिकांना भेडसावतायत. यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या, घनकचरा व्यवस्थापनाची समस्या, खड्डेमय रस्ते दुरुस्तीची समस्या, बंद व नादुरुस्त दिवाबत्ती बाबतची समस्या भेडसावत आहे.
२७ गावांमध्ये एमआयडीसी व केडीएमसी यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी पुरवठा केला जातोय. परंतु येथील जनतेला गेले कित्येक वर्ष सुरळीत पाणी पुरवठा होत नाही. घनकचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत तर फारच बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे दैनंदिनी निर्माण होणारा कचरा हा दैनंदिन उचलला जात नाही. त्यामुळे सर्वत्र घाणीचे व कचऱ्याचे साम्राज्य झालेले आहे. परिणामी नागरिकांना दुर्गंधी व रोग राइला समोर जावे लागत आहे.
दरवर्षी महानगरपालिकेमार्फत पावसाळापूर्व व गणेशोत्सवपूर्व रस्त्यांची दागडूजी केली जात असते. परंतु यावर्षी रस्त्यांची दुरुस्ती समाधानकारक झालेली नाहीये त्यात सध्या असलेले पर्जन्यमान त्यामुळे सर्वत्र रस्त्यांना खड्डेच खड्डे निर्माण झालेले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना शाळेतील विद्यार्थ्यांना पालकांना रस्त्यातून येण्या जाण्याचे फार अवघड झाले आहे. शिवाय पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत चाललेली आहे. तरी गणपती उत्सव तरी खड्ड्यांमध्ये साजरा करण्याची लोकांना वेळ येऊ नये किंवा या खड्ड्यातून श्री गणरायाची मूर्ती जात येत असताना तुटून तिची विटंबना होऊ नये व नागरिकांच्या भावना दुखावल्या जाऊ नये याची काळजी महानगरपालिका प्रशासनाने घेतली पाहिजे. तात्काळ गणपती उत्सवाच्या आत रस्त्यांची दुरुस्ती झाली पाहिजे.
27 गावांच्या काही भागांमध्ये नवीन दिवाबत्तीची व्यवस्था करण्यात आली परंतु काही भागातल्या दिवाबत्ती अजून जुन्याच आहेत किंवा काहीच जागेवर नवीन पोलसहित दिवावती बसवणे अपेक्षित आहे परंतु तसं होत नाहीये परिणामी बऱ्याच ठिकाणी दिव्याबत्ती बंद आहेत काही नादुरुस्त आहेत काही जागेवर नवीन पोलची आवश्यकता आहे. या सर्व समस्यांच्या बाबतीत महानगरपालिका प्रशासन आयुक्त म्हणून आपण गांभीर्याने विचार करून सध्या येत असलेल्या गणेशोत्सवपूर्वी संबंधित कामांच्या समस्या सुटल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मोरेश्वर भोईर यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.
Post a Comment
0 Comments