कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई
करण्याचा अधिकारी ठेकेदारांना आयुक्तांचा
इशारा
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी आज मिलिंदनगर गौरीपाडा रस्त्यावरील तसेच शहरातील इतर अनेक ठिकाणी खड्डे भरण्याच्या कामांची पाहणी केली. गणेशोत्सव महत्त्वाचा सण असल्याने केडीएमसी अधिकारी 24 तास ऑन ड्युटी असून गणेशोत्सवापूर्वी केडीएमसी क्षेत्रातील रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचा विश्वास आयुक्त अभिनव गोयल यांनी व्यक्त केला. तर खड्डे भरण्याच्या कामात निष्काळजीपणा केल्यास कारवाई करणार असल्याचा इशारा अधिकारी आणि ठेकेदारांना दिला आहे. यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांसह इतर अधिकारी उपस्थित होते.
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे भरण्यात येत असतात. त्यानुसार युद्धपातळीवर हे काम हाती घेतले आहे. नुकत्याच झालेल्या हा अतिवृष्टीमुळे खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून पावसामुळे काम करता आले नाही. आता पावसाने उघडीप दिली असून पालिका अधिकारी आणि ठेकदार यांची बैठक घेऊन दिवस रात्र काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रस्त्यांवरील वाहतूक लक्षात घेता रात्री जास्तीत जास्त काम करण्यात येणार आहे. गणेशोत्सवादरम्यान देखील पालिका सज्ज राहणार असून जिथे आवश्यकता लागेल तिथे ताबडतोब खड्डे बुजविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
Post a Comment
0 Comments