ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
सततच्या मुसळधार पर्जन्यवृष्टीनंतर सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचून, रोगराई होण्याचा संभव असतो. या रोगराईचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्व प्रभागांच्या सहा.आयुक्तांना आपापल्या प्रभागात सर्वत्र साफ-सफाईची मोहिम राबविणेबाबत तसेच प्रभागात धुरीकरण करणेबाबतचे निर्देश दिले आहेत.
गेले काही दिवस कल्याण-डोंबिवली परिक्षेत्रातही सर्व ठिकाणी अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे विशेष करुन वालधुनी सारख्या सखल भागात तेथील सहा.आयुक्त यांनी आपल्या पथकामार्फत डिप क्लिनींग ड्राईव्ह सुरु केला आहे. महापालिकेच्या इतर प्रभागातही सहा.आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचारी वर्गाच्या मदतीने पावसामुळे झालेला चिखल, वाहून आलेला कचरा व गाळ इ. उचलण्याची व्यवस्था करुन साफ-सफाई करण्यास सुरुवात केली आहे.तसेच डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुर परिस्थितीच्या घरांमध्ये सखल भागात धूर,जंतुनाशक फवारणी देखील केली जात असल्यामुळे, नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Post a Comment
0 Comments