ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कृषी उत्पन्न बाजार समितीतील इमारतींवर बेकायदेशीर बांधकाम करत थाटले हॉटेल्स आणि मंगल कार्यालय.अशा आशयाची बातमी प्रसारमाध्यमात प्रकाशित झाली होती.
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका इमारतीच्या गच्चीवरील लग्न कार्यासाठी एक मंगल कार्यालय बांधण्यात आले आहे.वास्तविक शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी विक्री साठी बाजार समिती स्थापन केली जाते.ह्या समितीच्या आरक्षित जागेवरील एका इमारतीच्या गच्चीवरील संबंधित बांधकामावर अनधिकृत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.आणि एपीएमसी प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने त्वरित कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्त्याकडून मागणी करण्यात आली होती.
ह्या संबंधी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका इमारतीच्या टेरेसवर थाटलेल्या भव्य मंगल कार्यालयाच्या संबंधितांशी संपर्क करून वरील बांधकाम हे अनधिकृत असल्याच्या तक्रारी विषयी विचारणा केली असता, तेव्हा,त्यांनी त्याचे खंडण करीत सांगितले की... "सदर मंगल कार्यालय हे बाजार समितीच्या एका इमारतीच्या गच्चीवरील जागेत रीतसर परवानगी घेऊनच बांधण्यात आले आहे.बाजार समितीच्या बैठकीत सर्वानुमते ही जागा भाडेतत्वावर आम्हाला देण्यात आली असून,तेथील बांधकामाची परवानगी सुद्धा कल्याण डोंबिवली महापालिकेकडून घेण्यात आली आहे. त्या संदर्भातील सर्व कायदेशीर कागदपत्रे आमच्याकडे आहेत". "अनधिकृत बांधकाम म्हणून आमच्या मंगल कार्यालयाच्या नावाची नाहक बदनामी होत असून,ह्या सर्व गोष्टी आमच्या व्यवसायाला मारक ठरू शकतात."असे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे.
त्याच अनुषंगाने कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात विचारणा केली असता त्यांच्या कडूनही सांगण्यात आले की,सदर मंगल कार्यालयासाठी ती जागा रीतसर आणि अधिकृतपणे आधीच्या कार्यकारी मंडळाने सर्वसंमत ठराव मंजूर करून भाडेतत्वावर दिलेली आहे.शासनाच्या नियमानुसार अटी शर्थींच्या आधारे ती जागा देण्यात आलेली आहे.
ह्या संदर्भात केडीएमसी प्रशासनाकडे चौकशी केली असता, त्यांनी सदर प्रकरणी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
ह्या प्रकरणात नेमके कोण दोषी हे अस्पष्ट असल्या मुळे,महापालिका प्रशासन आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यासंबंधी काय भूमिका घेते हे लवकरच पाहायला मिळेल.
Post a Comment
0 Comments