Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गणेश मंडळाचा कार्यकर्ता हाच उद्याचा नेता ठरतो – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 गणेश मंडळाच्या माध्यमातून कार्यकर्ता उभारी घेत असतो. मी देखील गणेश मंडळाच्या कार्यकर्ता पासून नगरसेवक, आमदार, विधानसभा उपाध्यक्ष झालो असल्याचे मत विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी कल्याणमध्ये व्यक्त केले. कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन अण्णा बनसोडे यांच्याहस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.   
       कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे कार्यालय कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे थाटण्यात आले आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे व आमदार सुलभा गायकवाड याच्या हस्ते गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले तसेच पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या. कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाची स्थापना सन 1989 मध्ये करण्यात आली असून जवळपास 35 वर्ष झाली आहेत. यावर्षी सन  2025- 26 अध्यक्षपदी सागर भालेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

       अण्णा बनसोडे यांनी सांगितले की, कल्याण शहरातील छोटे मोठे गणेश मंडळ एकत्रितपणे करुन एक महामंडळ स्थापन केले आहे हि अतिशय चांगली कल्पना आहे. मंडळाचे 36 वे वर्ष आहे. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यक्रमातून कार्यकर्ता उभारी घेता येते. याचे उदाहरण तुमच्या समोर आहे. आमचे हि गणेशोत्सव मंडळ आहे, मी मंडळाचा कार्यकर्ता आहे आणि तेथूनच मी पुढे पुढे जात गेलो. आज मंत्रीपद मिळाले आहे. तसेच कल्याण मधील लोकप्रतिनिधींनी निधीची मागणी केल्यास मी तत्काळ लगेच राज्य सरकार कडे पाठपुरावा करून निधी मंजूर करुन देणार असल्याचे आश्वासन बनसोडे यांनी दिले.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार प्रकाश भोईर, माजी नगरसेवक व गणेशोत्सव महामंडळाचे  संस्थापक अभिमन्यू गायकवाड, प्रदीप नातू, विजय कडव, राजा सावंत, संजय मोरे, प्रतिक पेणकर, सल्लागार वरुण पाटील, मिलिंद सावंत, सुभाष पेणकर, राकेश मुथा, कांचन कुलकर्णी, नयना भोईर, वैभव हरदास, वंदना मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
सन 2025-26 ची नविन पदाधिकारी नियुक्त्या करण्यात आल्या. अध्यक्ष सागर भालेकर, कार्याध्यक्ष विनोद केणे, स्वागत अध्यक्ष गणेश चौधरी, गौरी प्रमुख स्वाती कदम, परिक्षक प्रमुख रमाकांत चौधरी, सुनील डाळींबे, सहसचिव सचिन पोपलाइतकर, राहुल कासारे, यशोदा माळी, सतीश बनसोडे, किरण गायकवाड, शाम आवारे, राजीव भोईर  यांच्या सह गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.








 

Post a Comment

0 Comments