ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
या वर्षीच्या श्री गणेशोत्सवासाठी श्री गणेश भक्तांच्या सोयीसुविधांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मंडळांना लागणाऱ्या विविध परवानगी जलद गतीने व एका ठिकाणी प्राप्त व्हावी, याकरीता ऑनलाईन एक खिडकी प्रणालीचा वापर या वर्षीपासून सुरु केला आहे.
महापालिकेच्या विद्युत विभागामार्फत एकुण 76 विसर्जन स्थळी जनरेटरची व्यवस्था करण्यात आली असून, 2475 हॅलोजन, 558 एलईडी, 105 लाईटनिंग टॉवर तसेच 38 प्रमुख लोकेशन्सवर 212 सीसीटीव्हीची कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कल्याण मधील नागरीकांना श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी एकुण 65 ठिकाणी महापालिकेमार्फत व्यवस्था करण्यात आली असून, यामध्ये अ, ब, क, ड व जे प्रभागात “विसर्जन आपल्या दारी” ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
तर डोंबिवली मधील नागरीकांना श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी एकुण 62 ठिकाणी महापालिकेमार्फत व्यवस्था करण्यात आली असून, यामध्ये फ, ग, ह, आय व ई प्रभागात “विसर्जन आपल्या दारी” ही संकल्पना राबविण्यात येत आहे. शासनाच्या निर्देशानुसार 6 फुटा पेक्षा कमी उंचीच्या सर्व मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करणे आवश्यक आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे. तरी यावर्षी महापालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.
Post a Comment
0 Comments