Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जागरूक नागरिकाने केला सोशल मिडीयाचा सदुपयोग आणि खडबडून जागे झाले प्रशासन

 

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण शहराचा भाग परंतु मागासलेल्या खेडेगावापासून बिकट अवस्था असलेल्या सापाड गावातील ग्रामस्थ दिनेश मढवी यांनी सापडगाव ते कल्याण शहर या प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचे व्हिडिओ काढून सोशल मिडीयावर वायरल करताच ऐन श्री गणपती आगमनाच्या दिवशी रस्त्यातील खड्डे बुजवण्याचे काम चालू झाले.

सापाडकर ग्रामस्थ गेल्या ४० वर्षापासून दरवर्षी न चुकता कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनास टॅक्स व इतर कर नित्य नियमाने भरतात. परंतु केडीएमसी स्मार्ट सिटीचा भाग असून सुद्धा एखाद्या मागासलेल्या खेड्यात राहतो असे ग्रामस्थांना वाटत आहे. याच परिस्थितीला कंटाळून दिनेश मढवी यांनी सोशल मिडीयावर व्हिडीओ टाकला.

    कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील प्रभाग क्र. १ सापाड-उंबर्डे-कोळीवली-गांधारे विभागात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे  येथील जनता होरपळून निघाली आहे. सामान्य नागरिकांना होणारा त्रास अनावर होऊन ते व्यक्त होत आहेत. सत्यता व्यक्त केल्याने स्थानिक ग्रामस्थांवर दबाव आणण्यासाठी त्यांना फोनवरून व इतर माध्यमातून धमक्या व दमदाटी करण्याची दाट शक्यता असल्याची प्रतिक्रिया आम आदमी पार्टी कल्याण पश्चिम अध्यक्ष रुपेश पाटील यांनी व्यक्त केली आहे.  


Post a Comment

0 Comments