ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कोळसेवाडी पोलीस स्टेशनमधील रेकाॅर्डवरील गुन्हेगार अरबाज हबीब शेख, वय 23, राह.खडेगोलवली, कल्याण पुर्व, जिल्हा ठाणे याच्या विरुध्द महाराष्ट्राचा झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्षन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेटस्) वाळु तस्कर व अत्यावश्यक वस्तुंचा काळाबाजार करणारी व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणेबाबतचा अधिनियम 1981(सुधारणा 1996)(सुधारणा 2009)(सुधारणा 2015) भारतीय घटनेचे कलम 22(5) या सह सदर कायदयाचे कलम 3 चे पोटकलम (2)अन्वये धोकादायक व्यक्ती म्हणुन कोळसेवाडी पोलीस ठाणे कडुन पोलीस आयुक्तांना अहवाल सादर करण्यात आला होता.
याबाबत पोलीस आयुक्तांनी त्यांच्या कार्यालयीन आदेश क्रमांक/टीसी/पीडी/एमपीडीए/13/ 2025 दिनांक 22/08/2025 अन्वये एक (1) वर्ष कालावधी करीता स्थानबध्द करण्याबाबतचा आदेश पारीत केला आहे.
त्यानुसार अरबाज हबीब शेख यास ताब्यात घेवुन शनिवारी या आदेशाची बजावणी करून त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास 1 अधिकारी व 3 अमलदार यांना मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे पोलीस पार्टीसह रवाना केलेले होते. त्यास शनिवारी नाशिक जेल येथे जमा करण्यात आलेले आहे.
Post a Comment
0 Comments