ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण शीळ रस्त्यातील खड्डयामुळे झालेल्या अपघातात कल्याणातील एका तरूणाला जीव गमवावा लागला आहे. रोहन शिंगरे हा तरूण कल्याण पश्चिमेतील रामबाग येथील आरती सोसायटी येथे राहत होता. तो वाशी येथील खाजगी बँकेत कामाला होता. कामावर जाण्यासाठी तो दररोज त्याच्या बाईकने कल्याण ते वाशी असा प्रवास करायचा.
23जुलै रोजी नेहमी प्रमाणे कामावर जाण्यासाठी बाईकने निघला असता, साडेनऊ च्या सुमारास त्याची बाईक कल्याण शीळ रस्त्यावरील पिंपळेश्वर परिसरात पोहचली असता त्या ठिकाणी रस्त्यातील खड्यात त्याची बाईक जोराने आदळली. त्यामुळे रोहनचा तोल गेला आणि रस्त्यावर पडला त्याचवेळी त्याच्या मागून भरघाव येणाऱ्या ट्रँकच्या चाकाखाली त्यांचा हात गेला. हातावरून चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्याच मोबाईल वरून काही जणांनी फोन करून त्याच्या वडीलांना अपघाताची बातमी दिली. हे ऐकताच त्यांना धक्का बसला, त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
रोहनला उपाचारार्थ खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर वाशीतील महात्मा फुले ट्रस्ट रूग्णालयात हलविले, उपाचारादरम्यान त्यांचा एक हात काढवा लागला,त्याची प्रकुती सुधारत असताना अचानक प्रकृती बिघडली आणि उपचार दरम्यान 15आँगस्ट रोजी दुर्दैवी मुत्यु झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे.
रोहनची बहिण रिध्दी हिने प्रसिद्धी माध्यामांना सामोरे जाताना प्रशासनाला आर्त हाक दिली आहे की, खड्यामुळे माझ्या भावाचा जीव गेला आणखी कोणाचा जीव जाऊ नये, प्रशासनाने वेळीच उपाय योजना केली पाहिजे." या घटनेने रस्त्यातील खड्डे प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाने रस्त्यातील खड्डे बुजविले पाहिजेत अशी मागणी जोर धरू पाहत आहे.
Post a Comment
0 Comments