ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिमेतील बारावे गाव शिवमंदिर रस्त्यालगत स्त्री जातीचे नवजात बाळ आढळल्याने मानवतेला कळिमा फासणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील बारावे गाव शिवमंदिर रस्त्या परिसरात कचरा कुंडी जवळ नवजात स्त्री जातीचे बाळ आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून ग्रामस्थ धावले, ग्रामस्थांनी यासंदर्भात खडकपाडा पोलीसांना माहिती दिली, पोलिसांनी यासंदर्भात मनपा आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता डॉ. समीर सरवणकर यांनी परिचारिका आणि मदतनीस माध्यमातून वसंत व्हाली येथील सुतिका गुहात बाळाला आणित देखरेख सुरू केली असल्याचे प्रसिध्दी माध्यमा़ना सरवणकर यांनी सांगितले. तर पोलिसांनी निर्दयी पालकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन विशेष पथके सक्रिय, केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
Post a Comment
0 Comments