Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचा पारितोषिक समारंभ संपन्न

 

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 कल्याण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे 2024/25 साला साठी सार्वजनिक गणेश मंडळांना विविध प्रकारच्या उत्कृष्टतेसाठी पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. कल्याण पश्चिमेतील के. सी.गांधी हायस्कूलच्या  ऑडिटोरियम मध्ये  हा सोहळा पार पडला.त्या प्रसंगी कल्याण परीसरातील विविध शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळाही पार पडला.वेगवेगळ्या गटातील एकूण 50 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.गणेशोत्सव महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री वरुण पाटील यांच्या हस्ते,तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते हा सत्कार सोहळा पार पडला.






तसेच कल्याणातील सार्वजनिक गणेश मंडळांना उत्कृष्ट सजावट,उत्कृष्ट मूर्ती, आणि इतर गोष्टींसाठी भरघोस पारितोषिक देऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रमाला सार्वजनिक महामंडळाचे आजी माजी पदाधिकारी,आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






कल्याण शहरातील राजकारण विरहित सर्वपक्षीय ही महामंडळ असल्या कारणाने सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.त्यात कल्याण पूर्वेच्या विद्यमान आमदार सौ.सुलभा गायकवाड,उद्योजक श्री, अभिमन्यू गायकवाड, भाजपाचे माजी  जिल्हा अध्यक्ष श्री.नाना सूर्यवंशी,विद्यमान जिल्हा अध्यक्ष श्री नंदू परब,प्रतीक पेणकर, श्री प्रदीप नातू श्री राजा सावंत श्री विजय कडव श्री संजय मोरे, श्री सुभाष पेणकर,श्री वैभव हरदास, श्री मिलिंद सावंत,    सौ नयना भोईर, सौ कांचन कुलकर्णी, श्रीमती वंदना मोरे,आणि समस्त आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री वरुण पाटील यांनी येणाऱ्या गणेशोत्सव साठी महामंडळाच्या  अध्यक्ष पदाची माळ श्री.सागर भालेकर यांच्या गळ्यात घातली.आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत महामंडळाची धुरा सांभाळताना आपण सर्व कार्यकर्ते म्हणून नवीन अध्यक्षा सोबत असल्याची ग्वाही दिली.

Post a Comment

0 Comments