Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत केला पक्षप्रवेश

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याणमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गटाला खिंडार पडली असून  राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत ठाण्यातील आनंद आश्रम येथे हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख रवी पाटील आदींसह इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.   
कल्याण पश्चिमचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेश बोरगावकर, वॉर्ड अध्यक्ष गोरख साबळे, महिला वॉर्ड अध्यक्ष उषा गोरे, तसेच उबाठा गटाचे टिटवाळा उपशहरप्रमुख श्रीधर दादा खिस्मतराव, शाखाप्रमुख ज्ञानेश्वर मडवी, उपविभाग प्रमुख प्रशांत मोहिते, उपशाखा प्रमुख गजानन पाटील आणि त्यांच्या पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला आघाडीच्या सदस्यांनीही शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. 

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात स्थानिक लोकप्रतिनिधी, शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी, महिला आघाडी आणि शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी नव्याने प्रवेश केलेल्या सर्वांचे जाहीर स्वागत करण्यात आले आणि त्यांच्या पुढील राजकीय-सामाजिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
       प्रभागातील कामे झाली पाहिजेत अशी कार्यकर्त्यांची मागणी होती. त्यानुसार प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेत प्रवेश केला असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी यावेळी दिली.

Post a Comment

0 Comments