गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,समाजातील कर्तुत्वान व्यक्तींना समाजरत्न पुरस्कार तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार आणि वर्षातून एकदा दिला जाणारा मानाचा समाजभूषण पुरस्कार यांचे वितरण होणार
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समिती कल्याण ही संस्था गेले 37 वर्ष कल्याण डोंबिवली परिसरात समाजाचे एकजुटीसाठी तसेच समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक विकासासाठी कार्य करीत आहे. संस्थेच्या वतीने वैद्यकीय शाखेचे अध्यक्ष डॉ. श्याम घुगे यांचे मार्गदर्शनाखाली मोफत वैद्यकीय तपासणी शिबीर तसेच नेत्र चिकित्सा शिबीर, तसेच रक्तदान शिबिर असे विविध आरोग्य विषयक उपक्रम राबविले जातात. महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्वान महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन तसेच महिलांच्या आर्थिक सबलीकरण व सामाजिक, सांस्कृतिक विकासासाठी विविध कार्यक्रम महिला शाखा अध्यक्ष लता पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतात. त्याच प्रमाणे युवा शाखा अध्यक्ष एडवोकेट संग्राम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकांसाठी उद्योग मार्गदर्शन शिबीर,पोलीस भरती मार्गदर्शन शिबीर, असे युवकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचे उपक्रम राबविले जातात.त्याचप्रमाणे शैक्षणिक शाखेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम तसेच दहावी, बारावी, पदवीधर विद्यार्थ्याचा गुण गौरव करण्यात येतो. आशा या संस्थेच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 17 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता कल्याण बँक्वेट हॉल, कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण पश्चिम येथे वंजारी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर वेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार,समाजातील कर्तुत्वान व्यक्तींना समाजरत्न पुरस्कार तसेच आदर्श शिक्षक पुरस्कार आणि वर्षातून एकदा दिला जाणारा मानाचा समाजभूषण पुरस्कार यांचे वितरण होणार आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री सुहास कांदे तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी जास्त जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहून समाजाची एकजूट दाखवावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष शंकरराव आव्हाड यांनी केले आहे.
Post a Comment
0 Comments