कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस हाताळतील
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
15 ऑगस्ट रोजी केडीएमसी क्षेत्रांत चिकन मटण विक्रीला आणि कत्तलखाने यांच्यावर बंदी असल्याचे परिपत्रक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने काढलं होतं. यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाल्या नंतर देखील केडीएमसी आपल्या निर्णयावर ठाम असून केडीएमसी क्षेत्रांत मांसाहार खाण्यावर बंदी नसून कत्तलखाने आणि विक्रीस बंदी असल्याचे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी स्पष्ट केले आहे. तर यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस प्रशासन ते हाताळतील असे सांगत आपली जवाबदारी झटकण्याचा प्रयत्न केडीएमसी आयुक्तांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला.
यावेळी बोलतांना आयुक्तांनी सांगितले कि, राज्य शासनाच्या माध्यमातून असे निर्णय स्थानिक स्वराज्य संस्था घेऊ शकते. 1988 साली हा ठराव करण्यात आला होता. नव्याने कुठलाही निर्णय घेतला नाही. हा नियम कत्तलखाने आणि विक्रेत्यांवर बंदी आहे खायला कोणतीही बंदी नाही. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील हा निर्णय घेतला आहे. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा राज्य शासनाच्या सूचना असून बंदी मागे घेण्याबाबत विचार विनिमय करून निर्णय घेणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तर 15 ऑगस्ट रोजी नियमांचे उल्लंघन केल्यास परवाना विभाग कारवाई करणार आहे. यादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस प्रशासन ते हाताळतील असेही आयुक्तांनी सांगितले.
Post a Comment
0 Comments