Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कलासाधना सामाजिक संस्था. नवी मुंबई आयोजित राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

 

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कलासाधना सामाजिक संस्था, नवीमुंबई यांच्या वतीने प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी स्वतंत्रता दिवस निमित्त... (१५ ऑगस्ट) राज्यस्तरीय फलक लेखन स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले  होते. कला शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ह्या स्पर्धेसाठी स्वतंत्रता दिवस हा विषय देण्यात आला होता. महाराष्ट्र राज्यातून या स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद लाभला होता. सर्व विजय स्पर्धकांना  ७ सप्टेंबर रोजी कामोठे, नवी मुंबई येथे  कार्यक्रमांमध्ये सन्मानचिन्ह/ सन्मानपत्र  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेचे परीक्षेक म्हणून  राधिका कुसुरकर वाघ(चित्रकार व प्राध्यापक /सर जे.जे. स्कूल ऑफ डिझाईन )डॉ. गजानन शेपाळ (चित्रकार व मा.प्राध्यापक /सर जे. जे स्कूल ऑफ आर्ट )मनोहर एस.बाविस्कर(कलाशिक्षक / चित्रकार ( फळा तेथे शाळा/ सुयश चित्रकला पुस्तकाचे लेखक ) यांनी केले. असेच संस्थेच्या अध्यक्षा सौ. मेघा महाजन यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच पुढील विजयी स्पर्धकांचा निकाल त्यांनी जाहीर केला.



स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे....

प्रथम पारितोषिक -नरेंद्र हिरामण भुसारे.

द्वितीय पारितोषिक-सुनिल प्रकाश भोसले 

तृतीय पारितोषिक-घनश्याम प्रकाश बोरसे /चित्रसेन वासुदेव पागधरे

उत्तेजनार्थ पारितोषिक ..दिनेश शंकर रिकामे, दाभाडे सुनिल आनंदा, विठ्ठल दत्ताञय काकडे,सिराज हैदर तडवी, अर्जुन सरस्वती धाकु माचिवले, अमरसिंग टेंबऱ्या वसावे, बाबुलाल मंगतू जाधव, दत्ताराम रामचंद्र कोकरे, मेघा प्राणजीत बोरसे, मुरलीधर के.कुंभार, नरेंद्र दादाजी साबळे, शंकर रामचंद्र सोनावणे, विजय काशिनाथ सूर्यवंशी, दिनेश नामदेव सूर्यवंशी

 .

Post a Comment

0 Comments