Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

समाज कल्याण विभागांतर्गंत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

ऑगस्ट २०२५ अखेर ऑनलाईन अर्ज दाखल करण्याचे आवाहन 

                ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर 

 समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने ५% दिव्यांग कल्याण सेस व २०% जिल्हा परिषद सेस अंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व मागासवर्गीय (SC/ST/NT) लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून, लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://zpthaneschemes.com या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्वला सपकाळे यांनी केले आहे.

५% दिव्यांग कल्याण सेस अंतर्गत प्रमुख योजना:

1. दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देणे.

2. दिव्यांग लाभार्थ्यांना तीन चाकी वाहन(स्कुटी) खरेदीसाठी अनुदान देणे

3. दिव्यांग-दिव्यांग व्यक्तिंना विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे.

4. दिव्यांग शेतकऱ्यांना शेतीपुरक व्यवसायासाठी शेळीपालन वराहपालन, मत्स व दुग्धव्यवसाय इत्यादीसाठी   अर्थसहाय्य देणे.

5.     दिव्यांग पालकाच्या मुलीसाठी माझी लेक योजनेअंतर्गंत रु 50000/-मुदतठेव रक्कम ठेवणे.

6.     उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी अपंग विद्यार्थ्याना विशेष शिष्यवृत्ती देणे.

२०% जिल्हा परिषद सेस अंतर्गत प्रमुख योजना:

1. इ.5 वी ते 9 वी च्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकली पुरविणे.

2. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे (एकवेळ)

3. मागासवर्गीय इयत्ता 11वी व 12 वी तील विद्यार्थ्याना MH-CET ENINREEING/JEE//NEET च्या प्रशिक्षणवर्गाची खाजगी संस्थेला दिलेल्या फीची प्रतिपूर्ती करणे.

4. मागासवर्गीय लाभार्थ्यांना व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य देणे व वैयक्तिक लाभार्थी/महिला बचत गट यांना लघुउद्योगासाठी अर्थिक सहाय्य देणे.

5.     मागासवर्गीय विद्यार्थ्यांना MSCIT संगणक / टंकलेखन (मराठी/इंग्रजी) प्रशिक्षण पुर्ण केल्यावर फी प्रतीपुर्ती करणे.

6.     मागासवर्गीय लाभार्थ्यांना  डिस्को जॅकी (D.J.) साहित्य पुरविणे.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

आधारकार्ड

बँक खाते

उत्पन्नाचा दाखला

शैक्षणिक / प्रशिक्षण प्रमाणपत्रे

दिव्यांगत्व प्रमाणपत्र (दिव्यांग अर्जदारांसाठी)

जात प्रमाणपत्र (मागासवर्गीय अर्जदारांसाठी)

स्थानिक स्वराज्य संस्थेचे दाखले

अर्जाची सविस्तर यादी व तपशील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अर्ज पडताळणी कालावधी:

तालुका स्तर तपासणी: १ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२५

जिल्हा स्तर तपासणी: १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५

           अर्ज प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व सुलभ ठेवण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील व वार्षिक उत्पन्न रु. १ लाखपर्यंत असणाऱ्या दिव्यांग व मागासवर्गीय लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

           जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व पात्र लाभार्थ्यांनी ही सुवर्णसंधी साधून ३१ ऑगस्ट २०२५ रोजी पर्यंत अर्ज दाखल करून योजनांचा लाभ घ्यावा. तसेच ग्रामसेवक, सरपंच, शाळा व महाविद्यालयांनी पात्र लाभार्थ्यांपर्यंत माहिती पोहोचवून योजनांमध्ये सहभाग वाढवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहितीसाठी

जनसंपर्क अधिकारी, जि.प.ठाणे रेश्मा सावित्री गंगाराम आरोटे. संपर्क क्रमांक – 9326353289


Post a Comment

0 Comments