ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
महिलांना गोडवा आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून साखरेचे वाटप करण्यात आले. गरजू विद्यार्थ्यांना वह्या , पेन , पेन्सिल , दप्तर आदिशालय साहित्याचे वाटप करून त्यांच्या शिक्षणात हातभार लावण्यात आला.स्थानिक नागरिकांसाठी उपयोगी ठरणारे विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले.
या उपक्रमात स्थानिक नागरिक महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दाखिणकर यांचे कार्य सर्वांनी कौतुकाने पाहिले आणि त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक महेश गायकवाड, अखिल भारतीय सेना ठाणे जिल्हा प्रमुख आय फाउंडेशन संस्थापक शिवसाई प्रवासी संघटना संस्थापक राजेश दाखिनकर , मित्र परिवार, नातेवाईक, राजकीय, पक्षातील, कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने यावेळी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांची गर्दी यावेळी दिसून आली . यावरूनच कळते की दाखिंनकर यांच्यावर नागरिकांचे किती प्रेम आहे.
Post a Comment
0 Comments