ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
आयोजक माजी नगरसेविका उपजिल्हा संघटक माधुरी प्रशांत काळे, विभाग समन्वयक महेंद्र विठ्ठल एटमे यांनी दिनांक 27 जुलै रोजी विजयनगर ,जनसंपर्क कार्यालय, कल्याण पूर्व, येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तीनशेहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव सोहळा आणि वयावाटप , शालेय साहित्य वाटप करण्यात आले . यावेळी 4000 हून जास्त वह्या वाटप करण्यात आले. यावेळी महेंद्र ऍटमे यांनी आपले सर्वांचे लाडके प्रशांत दादा काळे हे आजारी असल्यामुळे बाहेर येऊ शकत नाही तरी आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून त्यांना दीर्घायुष्य लाभू दे त्यांना लवकरात लवकर आई जगदंबा बरं करून सर्वांच्या सेवेसाठी येऊ दे ही प्रार्थना केली.
Post a Comment
0 Comments