Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राज्य गूप्त वार्ता कल्याण विभागातील संभाजी देशमुख दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित

 

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगीरीमूळे राज्य गूप्त वार्ता विभागातील पोलीस अधिकारी संभाजी देशमुख यांना सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती पोलीस मेडलने सन्मानित करण्यात आले आहे. राजभवन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेगृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात संभाजी देशमुख यांना हे मेडल प्रदान करण्यात आले.

याअगोदर संभाजी देशमूख यांना यापूर्वी 2016 मध्येही जाहीर झालेले राष्ट्रपतींचे मैडल राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते सन 2018 ला देण्यात आले असून 28 जूलै रोजी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पोलीस महासंचालक रश्मी शूक्ला यांच्या हस्ते देऊन कुटुंबासह सन्मानित करण्यात आले आहे. सध्या राज्य गुप्त वार्ता विभागात कार्यरत असलेल्या संभाजी नारायण देशमूख यांनी पोलीस दलामध्ये ठाणे शहर आयूक्तालयअँन्टीकरप्शन विभागराज्य गूप्तवार्ता विभाग मुंबई - कल्याण या प्रमुख ठिकाणी रश्मी शूक्लाआशूतोष डूंबरेश्रीकांत सावरकरफत्तेसिह पाटीलछेरींग दोरजेकिशोर जाधवदिपक साकोरेसंदिप जाधवपराग मणेरे आदी वरिष्ठ अधिका-यांच्या  मार्गदर्शनामध्ये उत्कृष्ट सेवा बजावलेली आहे.

दुसऱ्यांदा मिळालेल्या या मानाच्या राष्ट्रपती पोलीस मेडलबद्दल संभाजी देशमूख यांच्यावर पोलीस अधिकारीशहरातील अनेक मान्यवर व्यक्ती नामांकित शैक्षणिक संस्था आणि मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Post a Comment

0 Comments