एका तक्रारीच्या आधारे स्विमिंग ट्रेनरला तरण तलावात करण्यात आला होता मज्जाव
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
एका तक्रारीच्या आधारे डोंबिवलीतील क्रीडा संकुलात असलेल्या स्विमिंग ट्रेनरला तरण तलावात मज्जाव करण्यात आला होता. याची दखल घेत शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी या स्विमिंग ट्रेनरला या तरण तलावात प्रवेश मिळवून दिला आहे.
डोंबिवली क्रिडा संकुलात केडीएमसी अधिकाऱ्यांनी एका तक्रारीच्या आधारे १५ दिवसांपासून स्विमिंग ट्रेनर रविंद्र आवळे यांना प्रशिक्षण देण्यास मज्जाव केला होता. काही महिन्यापूर्वी एका खाजगी ठिकाणी आवळे यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र क्रीडा संकुलात असलेल्या तरण तलावात आमच्या मुलांना हाच प्रशिक्षक हवा अशी मागणी मेडल विजेत्या जलतरणपट्टू खेळाडूंच्या पालकांनी शिवसेनेकडे केल्याने शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी केडीएमसी अधिकाऱ्यांना धारेवर धरत ट्रेनरला प्रवेश मिळवून दिला. तसेच पुन्हा मज्जाव केला तर शिवसेना स्टाईलने धडा शिकविण्याचा इशारा देखील दिला आहे.
कल्याण डोंबिवली महाालिकेचे अधिकारी मुलांना स्विमिंगचे प्रशिक्षण देण्यापासून एका स्विमर ट्रेनरला प्रवेशापासून रोखत होते. हा प्रकार पालकांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून देताच शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी डोंबिवली क्रीडा संकुलात धाव घेतली.
त्याठिकाणी स्विमिंग ट्रेनरला प्रवेश मिळवून दिला. अधिकारी वर्गास चांगलेच धारेवर धरत स्विमिंग ट्रेनरला पुन्हा मज्जाव केल्यास शिवसेना स्टाईलने धडा शिकविण्याचा इशारा कदम यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिला आहे. केडीएमसी भ्रष्टाचारासाठी बदनाम आहे असं ही ते यावेळी म्हणाले. गेल्या चाळीस वर्षात 48 अधिकारी पकडले गेले. एकाच दिवशी तीन अधिकारी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले. हेच अधिकारी पुन्हा कामावर रुजू होतील. हा नियम त्या अधिकाऱ्यांसाठी का लागू होत नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आकसा पोटी जाणीव पूर्वक खोटा गुन्हा दाखल केला असून माझ्या तक्रारी नंतर १५ दिवसांनी गुन्हा दाखल होतो. परंतु माझ्या हातून चॅम्पियन खेळाडू तयार होत आहेत आणि त्यांच्या पालकांना माझे प्रशिक्षण मान्य असून मी बेकसूर आहे, पण माझी बदनामी करून मला सर्व स्थरावर नाहक त्रास दिला जात आहे असे प्रशिक्षक अमित आवळे ह्यांनी मत मांडले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, उपतालुका प्रमुख राहुल गणपुले, युवासेना शहर अध्यक्ष सागर जेधे, शहर सचिव भूषण भगत, प्रशांत प्रधान आणि १०-१२ सर्वोत्कृष्ट व विजेत्या खेळाडू मुलांचे पालक उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments