ब्लॅक अँड व्हाईट ठाणे वार्ताहर
5 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त *ब्लॅक अँड व्हाईट* ह्या वृत्तपत्रा तर्फे यंदा *राज्यस्तरीय शिक्षकरत्न* पुरस्काराची घोषणा करण्यात येत आहे.त्या साठी राज्यभरातील शिक्षक बंधू भगिनींना आवाहन करण्यात येत आहे की,त्यांनी आपला प्रस्ताव दिनांक 30 ऑगस्ट पर्यंत खालील नंबरवर PDF स्वरूपात लवकरात लवकर पाठवावा.
पुरस्काराचे स्वरूप...आकर्षक स्मृतिचिन्ह,सन्मानपत्र, शाल व श्रीफळ.
या शुभ प्रसंगी ठराविक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची माहिती असलेला ब्लॅक अँड व्हाईट शिक्षकरत्न विशेषांकाचे प्रकाशन पुरस्कार सोहळ्याच्या जाहीर कार्यक्रमात उपस्थित नामवंत मान्यवरांच्या हस्ते करण्यात येईल.
विशेष सूचना...आपला प्रस्ताव हा PDF स्वरूपातच पाठवावा.सर्व प्रथम आपला फोटो असलेला बायोडेटा टाईप करून जोडलेला असावा.(फोटो..यासाठी की..जर आपली निवड झाली तर सन्मान पत्रावर आपला फोटो लावण्यात येईल).PDF करताना आपली इतर कागदपत्रे /फोटो सुस्पष्ट असतील याची खात्री करून घ्यावी.पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर आपल्याला फोनवर त्याबाबत माहिती कळविण्यात येईल.
परीक्षकांचा निर्णय हा अंतिम असेल.याची नोंद घ्यावी.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपल्याला जाहीर कार्यक्रमाचे ठिकाण आणि तारीख कळविण्यात येईल.
पुरस्कारासाठी प्रस्ताव पुढील नंबरवर (WhatsApp) वॉटसॲप वर पाठवणे. संपादक, 9158078601
प्रस्ताव पाठविण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट 2025 असून,लवकरात लवकर प्रस्ताव पाठवावा.ही विनंती.
Post a Comment
0 Comments