Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबरनाथ नगरपरिषदेतर्फे सफाई कामगार व शिपाई यांना पावसाळी साधनांचे वाटप

                 ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर 

अंबरनाथ नगरपरिषदेतर्फे मा. मुख्याधिकारी यांच्या आदेशान्वये आज सफाई कामगार व शिपाई यांना पावसाळी साधनांचे वाटप करण्यात आले. मा. उपमुख्याधिकारी यांच्या हस्ते या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी सफाई कामगार व शिपाई यांना गणवेश, रेनकोट, गमबूट तसेच चामडी काळे बूट देण्यात आले. पावसाळ्यात नागरिकांना स्वच्छतेच्या सुविधा पुरविताना कामगारांना सुरक्षितता व सोय व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.कार्यक्रमास नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे कामगारांचे मनोबल वाढून ते अधिक उत्साहाने कर्तव्य बजावतील, असा विश्वास मा. उपमुख्याधिकारी यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments