Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

घर घर संविधान" या अभियानातंर्गत केडीएमसीच्यावतीने जनजागृती

 

               ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
 "घर घर संविधान" या अभियानातंर्गत महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या निर्देशान्वये महापालिका पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली  जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन डोंबिवली पूर्व येथील संत तुलसीदास कडोंमपा हिंदी शाळा क्र. 86/2 येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात "पर्यावरण विषयक संकल्पना व कायदे" या विषयाच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये महानगरपालिका शालेय विदयार्थ्यांना एल.एल.बी व्दितीय वर्षींय अभ्यासकांकडून आणि पर्यावरण तज्ञ वैशाली तांबट यांचे कडून संविधानातील पर्यावरण विषयक कायदयाचे व इतर कायदयाचे महत्त्व विषद करण्यात आले.


तसेच या कार्यक्रमात पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी व आपत्तीचा सामना करण्याबाबत विदयार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एनडीआरएफ जवानांचे प्रात्यक्षिक व व्याख्यानाचे आयोनजही करण्यात आले होते. याच कार्यक्रमात पर्यावरण व प्रदुषण नियंत्रणामार्फत एनडीआरएफ जवानांसोबत रक्षा बंधन साजरे करीत भारतीय संस्कृतीचे महत्त्व देखील पर्यावरण विभागाने अधोरेखीत केले.

या कार्यक्रमास आमदार राजेश मोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. आमदार राजेश मोरे यांनी उपस्थित विदयार्थ्यांना पर्यावरण संरक्षण ही फक्त एकाची जबाबदारी नसून ती सामुहिकरित्या सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगत विदयार्थ्यांना संबोधित केले. यावेळी पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, उप अभियंता मुराई, एनडीआरएफ जवानांचे मुख्य वरिष्ठ निरिक्षक दिलीप कुमार, वरिष्ठ निरिक्षक विश्वनाथ दुधीया, महापालिकेचे अग्निशमन दलाचे उप अग्निशमन अधिकारी रवि गोवारी, फ प्रभागाच्या सहा.आयुक्त हेमा मुंबरकर व पर्यावरण व प्रदुषण नियंत्रण विभागाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.








Post a Comment

0 Comments