ब्लॅक अँड व्हाईट (डोंबिवली) विद्या कुलकर्णी
रिजन्सी अनंतम् लावण्यवती महिला मंडळाची स्थापना 4 वर्षापूर्वी रिजन्सी अनंतम् संकुलात झाली. महिला सक्षमीकरणासाठी असलेले हे संकुलातील एकमेव रजिस्टर असलेले महिला मंडळ आहे. आज या महिला मंडळात सुमारे 450 महिला सभासद आहेत.खास महिलांसाठी असलेले हे मंडळ महिलाना प्रोत्साहित करण्यासाठी उपक्रम राबवत असतात.
महिलाना स्वतःच्या आवडी निवडी, छंदाची जोपासना करता यावी, आपली संस्कृती जपत महिलांना काहीतरी सातत्याने शिकण्यास मिळावे हा उद्देश मंडळाच्या स्थापनेमागे आहे.
मंडळ स्थापन झाल्यापासून आज पर्यंत सातत्याने हळदी कुंकू, संकुलात कामासाठी येणाऱ्या गरजू महिलाना मोफत धान्य व त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, महिला दिन, आषाढी एकादशी निमित्त संकुलातील मंदिरात तुळशी वाटप व दिंडी मध्ये सहभाग, आरोग्य शिबिर, मतदान कार्ड आधार कार्ड शिबिर,गरबा कार्यशाळा, मुलांसाठी शैक्षणिक कार्यशाळा असे अनेकविध कार्यक्रम राबविले जातात यावरून दिसून येते की फक्त हळदीकुंकू सारख्या कार्यक्रमांपर्यंत मर्यादित न रहाता महिलांचा विकास हे एक ध्येय मनाचे दिसून येते.
महिलाना मत मांडण्याची संधी त्यातून विविध कार्यक्रमाचे आयोजन यामुळे पाक कला, सौंदर्य कला, व्यवसाय आणि गरजवंतांना मदत असे सर्व उपक्रम मंडळाकडून केले जात असतात.
त्यातीलच एक उपक्रम म्हणजे महिला सक्षमीकरण साठी व्यावसायिक प्रदर्शन 3 ऑगस्ट 2025 रविवार या दिवशी रिजन्सी अनंतम् संकुलात सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत भरवण्यात आले. हे मंडळाचे 12 वे व्यावसायिक प्रदर्शन लावण्यात आले होते. त्यात सुमारे 100 स्टॉल लावण्यात आले होते. या मध्ये महिलांनी विविध प्रकारचे दागिने, खाद्य पदार्थ, रांगोळ्या, cake, कपडे असे विविध प्रकाराचे स्टॉल ग्राहकांना उपलब्ध झाले. आणि मंडळाने या लहान उद्योजक महिलांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध केल्या बद्दल सदर महिला व्यावसायिकांनी मंडळाच्या अध्यक्षा सौ. सोनाली संदनशिव व सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्याचे आभार व्यक्त केले.
सदर व्यावसायिक प्रदर्शनाला कल्याण ग्रामीण विधानसभा चे आमदार माननीय श्री. राजेशजी मोरे साहेब यांनी भेट देऊन लावण्यवती महिला मंडळाचे कौतुक केले आणि पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी रिजन्सी अनंतम् लावण्यवती महिला मंडळ कार्यकारिणीतील अध्यक्षा सौ. सोनाली संदनशिव,सचिव सौ. हर्षदा पाठक,खजिनदार सौ. प्रियंका आंब्रे,सल्लागार सौ. अमृता गावडे तसेच मंडळाच्या सभासद सौ. विद्या कुलकर्णी,सौ. संध्या शिंदे, सौ. सुजाता कोरडे आणि इतर सर्वांनी आपला सहभाग नोंदवला.
Post a Comment
0 Comments