Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

काटईचे उपसरपंच काशिनाथ पाटील यांच्या तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप

 

                  ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

काटइ गावचे माजी उपसरपंच काशिनाथ कान्हा पाटील यांनी कासा बेला ,गणपती मंदिर, पलावा येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी छत्री वाटप या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी या छत्रीवाटप चा लाभ घेतला. यावेळी मनसे कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.








माजी आमदार राजू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच श्री.काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांसाठी वेळोवेळी समाजोपयोगी कार्य करीत असतात.त्याच अनुषंगाने परिसरातील  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी  शैक्षणिक साहित्य वाटप, छत्री वाटप करण्यात आलेआहे.

आजही  काटई पलावा येथील कासा बेला सोसायटीतील नागरिकांसाठी असाच समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित केला.गरजू विद्यार्थ्या शैक्षणिक साहित्य आणि छत्री वाटप करून.गणपती मंदिरात जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप कार्यात आले.त्या प्रसंगी हजारो नागरिक उपस्थित होते.मोठ्या संख्येने नागरिकांनी  छत्री वाटपाचा लाभ घेतला.कार्यक्रमाला परिसरातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,श्री काशिनाथ पाटील यांच्या निःस्वार्थी सेवा बद्दल आवर्जून धन्यवाद देत काशिनाथ पाटील यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments