ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
२० वर्षांनंतर श्रावण महिन्यातील अंगारकी चतुर्थीचा दुर्मिळ योग यंदा आज मंगळवारी जुळून आला होता. यादिवशी टिटवाळा येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दिवसभरात मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले. दर्शनासाठी येण्याची भाविकांची मंदिर ट्रस्टने व्यापक आणि सुसज्ज व्यवस्था केली होती.
कल्याण तालुक्यातील टिटवाळा हे मध्य रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे श्रद्धास्थान असून, महाराष्ट्रासह देशभरातून येथे भाविक येतात. साधारण दिवशी २५ ते ३० हजार भाविक दर्शन घेतात, तर संकष्टी चतुर्थी आणि अंगारकी चतुर्थीला ही संख्या एक लाखांपर्यंत पोहोचते. याच पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात रांग व्यवस्थापनासाठी विशेष मार्ग, पावसापासून बचावासाठी कायमस्वरूपी दर्शन मंडप, तसेच शिस्तबद्ध प्रवेश आणि निर्गमन व्यवस्था करण्यात आली होती. आज पहाटे ४ वाजता अभिषेक व आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले तर रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुले होते.
Post a Comment
0 Comments