Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कोळसेवाडी पोलिसांच्या वतीने गणेशोत्सव मंडळांचा गौरव

 

शिवगर्जना मित्र मंडळ प्रथम तर न्यु संघर्ष मित्र मंडळ द्वितीय 

                     ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

सार्वजनिक गणेश उत्सव 2024 मध्ये कोळशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत स्थापन झालेल्या 40 सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांपैकी सर्वोत्कृष्ट  सामाजिक उपक्रम राबविणारे मंडळ, देखाव्यातुन जनजागृती करणारे मंडळ तसेच शिस्तबद्ध मंडळ यांना सालाबाद प्रमाणे गणराया पारितोषिक प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक, तृतीय क्रमांक असे प्रमाणपत्र देवुन त्यांचा शुक्रवारी गौरव करण्यात आला.
  
    


 यामध्ये प्रथम क्रमांक शिवगर्जना मित्र मंडळ गवळीनगर, व्दितीय क्रमांक न्यु संघर्ष मित्र मंडळ, चिंचपाडा रोड, तृतीय क्रमांक अष्टविनायक सेवा मंडळ महावीर नगर, या मंडळांची निरीक्षण समिती सदस्य उमाकांत चौधरी,   प्रवीण खाडे,  शिवशंकर  साव  यांच्या निवड समितीने निवड केल्याने प्रथम क्रमांक, व्दितीय क्रमांक, तृतीय क्रमांक असे प्रमाणपत्र देवुन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच निरीक्षण कमिटी सदस्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. 

गणेशोत्सव मंडळांना  आगामी गणेश उत्सव सणामध्ये डी. जे. चा वापर करू नये. पारंपारिक वादयाचा वापर करावा. मंडळांनी समाजपयोगी कार्यक्रम राबवावेत तसेच आपण इतर मंडळांना आपल्याप्रमाणेच समाजपयोगी कार्यक्रम राबविण्या बाबत संदेश देण्यात यावा याप्रमाणे सुचना दिल्या. या प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास 15 ते  20  मंडळांचे पदाधिकारी, शांतता समिती सदस्य, पोलीस मित्र असे मिळून 22  ते 25 सदस्य उपस्थित होते. उपस्थित मंडळांच्या सदस्यांनी पोलीस दलातर्फे प्रमाणपत्र मिळाल्याने आभार व्यक्त केले असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments