Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याणात खडकपाडा व्यापारी, रहिवासी मंडळ व रोटरी क्लब यांच्या वतीने व तोरणा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व आरोग्य शिबीर संपन्न,

                      ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

खडकपाडा व्यापारी रहिवासी मंडळ तसेच तोरणा हॉस्पिटल नेरुळ व रोटरी कलब यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबीर  तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक व खडकपाडा रहिवासी मंडळाचे अध्यक्ष उमेश बोरगावकर यांच्या वतीने बेतुरकपाडा  येथे करण्यात आले होते,ह्या शिबिरात असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आली.




शिबिरात तज्ज्ञ  डॉक्टरांकडून नागरिकांची  मोफत आरोग्य तपासणी  करण्यात आली. तसेच काही नागरिकांना विशिष्ट आजाराचे निदान झाल्यास त्यांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत शस्त्रक्रिया उपचार करण्यात येईल असे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांनी सांगितले आहे.

नागरिकांनी पावसाळ्यात स्वतःची काळजी घ्यावी.आजारी पडल्यास व योग्य वेळी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.असेही श्री उमेश बोरगांवकर यांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments