Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कल्याण स्टेशनवर गांजा तस्कर आणि मोबाईल चोराला अटक

८.५ किलो गांजा आणि ३ मोबाईल फोन जप्त केले

आरपीएफ आणि जीआरपीची संयुक्त कारवाई

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 
कल्याण स्थानकावर गस्त घालत असताना, रेल्वे सुरक्षा दल आणि जीआरपी कर्मचाऱ्यांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एका गांजा तस्कर आणि एका मोबाईल चोराला अटक केली आणि त्यांच्याकडून महागडे मोबाईल फोनसह साडेआठ किलो गांजा जप्त केला.

कल्याण आरपीएफ सीपीडीएस टीमचे अधिकारी अनिल उपाध्याय, रणजीत चव्हाण आणि भगवान पाटील हे कल्याण स्टेशनवर गस्त घालत होते. त्याच वेळी, एक तरुण मेल एक्सप्रेसमधून उतरला आणि कल्याण स्टेशनच्या बाहेर जात होता. दोन्ही अधिकाऱ्यांना त्या तरुणाच्या हालचालींवर संशय आला. त्या तरुणाला थांबवण्यात आले. त्या तरुणाने आपले नाव सैफ दर्जी असे सांगितले. सैफ पिंपरी चिंचवडमध्ये काम करतो. तो प्रयागराज, उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. या तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडून तीन महागडे मोबाईल जप्त करण्यात आले.

 आरपीएफ अधिकाऱ्यांनी सैफला याबद्दल विचारले तेव्हा त्याच्याकडे कोणतेही उत्तर नव्हते. पण जेव्हा काटेकोरपणे विचारपूस केली तेव्हा सैफने संपूर्ण सत्य उघड केले. सिकंदराबाद एक्सप्रेसमधून प्रवास करताना त्याने तीन मोबाईल फोन चोरले होते. कल्याण जीआरपी पुढील तपास करत आहे. सैफीने यापूर्वीही चोरी केली आहे. अशा प्रकारची शंका व्यक्त केली जात आहे.

दुसरे प्रकरण गांजा तस्कराचे आहे. उत्तर प्रदेशातील फुलपूर येथील रहिवासी सिराज खान उत्तर प्रदेशहून येणाऱ्या ट्रेनमधून उतरला आणि कल्याण स्टेशनच्या बाहेर जाणारा पूल ओलांडत होता. त्याच्या हातात एक मोठी बॅग होती. सीपीडीएस पथकाने बॅगेची झडती घेतली तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला. आरपीएफच्या सीपीडीएस टीमनुसार, सिराजकडून सुमारे साडेआठ किलो गांजा जप्त करण्यात आला. तो गांजा विकण्यासाठी भिवंडीला घेऊन जात होता. याआधीही सिराजने अनेक वेळा उत्तर प्रदेशातून गांजा आणला आहे आणि भिवंडीत विकला आहे.  कोणाच्या मदतीने गांजा तस्करी केला जातो आणि कोणाला विकला जातो याचा तपास जीआरपी करत आहे.


Post a Comment

0 Comments