Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

केडीएमसीच्या प्र.के.अत्रे नाट्यगृहात नाटक सादरीकरणात चिलटे, पाखंराचा व्यत्यय

                ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

कल्याण डोंबिवली मनपाच्या प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात श्रीमंत दामोदर पंत नाटकाचा रविवारी संध्याकाळी प्रयोग सुरू असताना पाखरे, चिलटे यांच्या स्टेजवर फिरण्याने व्यत्यय होत असल्याने सुरू असलेला नाट्य प्रयोग पाच ते दहा मिनिटे थांबविण्यात येत मध्यांतरापूर्वी पडदा टाकण्याचा प्रसंग रविवारी ओढवला. यामुळे नाटक पाहण्यास आलेल्या नाट्य रसिकांचा बेरंग झाला.    

केडीएमसीच्या प्र के अत्रे नाट्यमंदिरात रविवारी 13 जुलै रोजी श्रीमंत दामोदर पंत लेखक दिग्दर्शक केदार शिंदे लिखित, प्रमुख भुमिका कमलाकर सातपुते, भरत जाधव या मान्यवर नाट्य कलाकारांचा प्रयोगाचा पहिला अंक सुरू असताना मध्यतंराआधी नाट्य सादरीकरण करत असताना पाखरे, चिलटे मंचकावर भिरभिरत असल्याने व्यत्यय निर्माण झाल्याने पाच ते दहा मिनिटे पडदा टाकण्यात आल्याचा प्रकार घडल्याने नाट्य रसिकांचा हिरमोड झाला.   


      

यासंदर्भात केडीएमसीचे नाट्यगृह व्यवस्थापक माणिक शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता, नाट्य गृहातील अंधार, स्टेजवरील प्रकाश झोत लाईट यामुळे पावसाळ्यातील लाईटकडे आकर्षीत होणारी  पाखरे मंचावर भिरभिरत असल्याने व्यत्यय होत असल्याने कलाकरांनी  नाट्य रसिकांना  सांगत  पाच मिनिटे पडदा टाकून लगेच नाट्य प्रयोग सुरू केला असल्याचे सांगितले.    

  केडीएमसीच्या प्र के अत्रे रंगमंदिराच्या बाह्य भागाचे लाखो रुपये खर्चून देखभाल दुरूस्तीचे काम सुरू असून, नाट्यगृहाबाहेरील रस्त्यावर थोड्याशा पावासाने देखील पाणी साचते. याच पाण्यातून वाट काढून प्रक्षेकांसह, नागरिकांना ये जा करावी लागत आहे. नाट्य मंदिराच्या मागील  प्रवेशद्वाराच्या  लगत कामासाठी  बांबूच्या परांचीचा वेढा आणि गेटलगतचा साठलेला कचरा अस्वच्छता बरेच काही सांगून जात असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसत आहे.


Post a Comment

0 Comments