Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

सोनी क्षीरसागर यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

 

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

आई एकविरा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सोनी क्षीरसागर आणि समाजसेवक संदीप क्षीरसागर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हाध्यक्ष नंदू परब,  महिला जिल्हाध्यक्ष रेखा चौधरी तसेच कल्याण ग्रामीण अध्यक्ष आतिश चौधरी यांच्या माध्यमातून क्षीरसागर यांचा  मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्यात आला. त्यावेळी प्रभाग क्रमांक 108 च्या वार्ड अध्यक्ष रागिनी सिंग व संदीप भाने यांची उपस्थित लाभली.

       क्षीरसागर दांपत्य हे गेली अनेक वर्षे आडीवली, ढोकळी, पिसवली, नांदिवलीसह कल्याण पूर्व परिसरात कार्यरत असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर असतात. प्रभागातील अनेक कामांबाबत केडीएमसी प्रशासनाकडे पाठपुरावा करून हि कामे मार्गी लावली आहेत. यासह नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असून मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत. या विकासकामांना प्रभावित होऊन आपण भाजपामध्ये प्रवेश करत असून आगामी काळात पक्ष संघटना वाढीसाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सोनी क्षीरसागर यांनी सांगितले.   

Post a Comment

0 Comments