ब्लॅक अँड व्हाईट गीता गायकर/ऐनकर(मोहने)
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ठाणे जिल्हा हा सामाजिक जाणीव असलेला पत्रकार म्हणून ओळखला जातो. त्यांनी राबविलेले उपक्रम आम्ही महाराष्ट्रात त्याचे आयडॉल म्हणून वापरतो.पत्रकार हा समाजाची बांधिलकी जोपासणारा असावा असे प्रतिपादन राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई संलग्न ठाणे जिल्ह्याच्या सर्वसाधारण सभेपूर्वी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड माळशेज घाट मार्गावरील जि.प. शाळा वैशाखरे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करताना केले.
गरजुवंत विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळावा आणि शैक्षणिक चळवळ अधिक गतिमान व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ,मुंबई शाखा ठाणे जिल्हा व मुरबाड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने म. रा. पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे ,राज्य संघटक संजयजी भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच मुरबाड तालुक्यातील वैशाखरे केंद्र शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
पत्रकार हा घेणारा नाही तर देणारा असतो. नेहमी इतरांना आपल्या हाताने मदत ही करत असतो. वर्ष भर तो विविध उपक्रम राबवित असतो. असे आमचे पत्रकार आहेत. असे यावेळी राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी बोलताना सांगितले.विद्यार्थ्यांना मुरबाड तालुक्याचा इतिहास माहिती करून द्यावा व तो वहीवर उतरवण्यात यावा असे मत पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांनी व्यक्त केले.पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा सचिव मिलिंद जाधव यांनी "आई मला शाळेला जायचं हाय" ,"आता साक्षर करूया गावं " अशा प्रबोधनात्मक कविता सादर केल्या.
यावेळी ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष गायकर, जिल्हा उपाध्यक्ष वसंत पानसरे ,जिल्हा सचिव मिलिंद जाधव, मुरबाड तालुका अध्यक्ष शेखर भोईर,कल्याण तालुका कार्याध्यक्ष जैतू मुठोळकर, कल्याण ता. अध्यक्ष योगेश गोडे , सामाजिक कार्यकर्ते इंजि.विजय ऐनकर,उपाध्यक्ष सचिन पोतदार, मुरबाड तालुका सल्लागार सतीश घरत, शहापूर तालुका उपाध्यक्ष संजय भालेराव,कार्याध्यक्ष राजीव चंदने , तालुका सचिव गोविंद भोईर, तालुका सहसचिव नितेश पवार ,कोषाध्यक्ष नरेश म्हाडसे ,सदस्य चंद्रकांत भोईर, कल्याण तालुका अध्यक्ष योगेश गोडे, अँड गीता गायकर, पोलिस पाटील विश्वनाथ नवले, शाळा व्य. समिती अध्यक्ष अंकुश भोईर,मुख्याध्यापक मनोहर घुडे, नंदकुमार इसामे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
.jpg)


Post a Comment
0 Comments