Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

एका शांत स्वप्नापासून ते उत्कृष्टतेच्या स्मारकापर्यंत...मॉडेल कॉलेज डोंबिवली

                  ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

डोंबिवलीतील मॉडेल कॉलेजच्या नूतन इमारतीचे उद्घाटन गोव्याचे राज्यपाल श्री. पी. एस.श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यपालांनी कॉलेजमधील शैक्षणिक सुविधांची पाहणी करून माहिती घेतली.मल्याळी समाजाकडून इतक्या मोठ्या स्वरूपात शैक्षणिक संस्थेचा  विकास बघून त्यांनी कॉलेजच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे खूप कौतुक केले.आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्या निमित्ताने कॉलेज मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


सन १९८९ मध्ये, डोंबिवली सारख्या छोट्याशा शहरात एका छोट्याशा जागेत शिक्षणाचे रोपटे रोवले गेले,ते त्याचा वटवृक्ष करण्याच्या हेतूनेच.मग त्या रोपट्याला जिवंत ठेवण्यासाठी अनेक हातांनी आपले योगदान दिले.

मल्याळी समुदायासाठी सामाजिक-सांस्कृतिक दीप असलेल्या केरळीय समाजम (नोंदणीकृत) च्या समर्पित सदस्यांच्या अखंड प्रयासाने ह्या शैक्षणिक  वटवृक्षाला वाढविले.केरळीय समाजमच्या माध्यमातून ह्या वटवृक्षाखाली डोंबिवली शहरातील अनेक पाखरांना सावली दिली,अनेकांची शैक्षणिक भूक भागविली गेली. 

अर्थात मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत फक्त एकच पदवीपूर्व बीकॉम देणारी एक साधी संस्था म्हणून मॉडेल कॉलेजची सुरुवात झाली. काही काळातच येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची आवड, उद्देश आणि शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन यावर ही संस्था दिवसेंदिवस वाढत गेली.कालांतराने उत्तरोत्तर संस्थेचा विस्तार झाला विस्तार हा केवळ चौरस फूट जागेचाच नाही तर शिक्षणाच्या कक्षाही वाढत गेली.

 कॉलेजच्या एकंदरीत प्रगतीचा लेखाजोखा मांडतांना कॉलेजचे प्रिन्सिपल प्राध्यापक आर. पी बांबर्डेकर यांनी पुढील माहिती दिली.

लेखा आणि वित्त, बँकिंग आणि विमा, वित्तीय बाजारपेठा व्यवस्थापन अभ्यास, मल्टीमीडिया आणि मास कम्युनिकेशन्स,माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान आणि अगदी सूक्ष्मजीवशास्त्र - प्रत्येक अभ्यासक्रम काळजीपूर्वक तयार करून विद्यार्थ्यांच्या भविष्याची वाटचाल सुकर करण्यात आली.

मॉडेल कॉलेजच्या संचालक,मंडळींनी उत्कृष्टतेचा ध्यास घेतल्यामुळेइथवरच न थांबता,पदवीपूर्व शिक्षणापासून, हे महाविद्यालय एक मान्यताप्राप्त पदव्युत्तर केंद्र करण्यात आले, जे अकाउंटन्सी, बिझनेस मॅनेजमेंट, बँकिंग आणि फायनान्समध्ये एम.कॉम. आणि आयटी आणि फायनान्समध्ये एम.एससी. प्रदान करते.व्यवसाय व्यवस्थापन, व्यवसाय अर्थशास्त्र आणि लेखाशास्त्र या विषयांमध्ये विशेषज्ञता असलेले वाणिज्य क्षेत्रातील मान्यताप्राप्त पीएच.डी. केंद्र म्हणून कॉलेज उदयास आल्याने एक प्रकारे  शिखर गाठले गेले - जे केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर भविष्यातील विद्वान आणि विचारवंतांना घडवत आले आणि घडवित राहणार.

प्रिन्सिपल आर. पी.बांबर्डेकर

या शैक्षणिक वर्षापासून, नवीन काळातील मागण्या लक्षात घेऊन  कृत्रिम बुद्धिमत्ता, बीएससी डेटा सायन्स, बीकॉम लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन मॅनेजमेंट तसेच बीए सायकॉलॉजी  असे भविष्यासाठीचे आणि वर्तमानासाठी आवश्यक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे.असे प्रिन्सिपल आर. पी.बांबर्डेकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

अध्यक्ष वर्गीस डॅनिअल

वास्तविक मॉडेल कॉलेजची केवळही वाढ नव्हती तर डोंबिवली साठी मल्याळी समाज संस्थेकडून सुरू करण्यात आलेल्या शैक्षणिक संस्थेची उत्क्रांती सिद्ध झाली आहे.आज घडीला मॉडेल स्कूल आणि कॉलेज मध्ये एकूण 14000 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थ्यांची संख्या 8000 इतकी आहे.आणि मॉडेल स्कूल आणि हायस्कूल मध्ये 6000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

दहा हजार सभासद असलेल्या मल्याळी समाजाच्या ह्या शैक्षणिक संस्थेचा आणखी विकास करायचा असून येत्या काही काळातच उच्चशिक्षणाची दालनं उघडण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष वर्गीस डॅनिअल यांनी सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments