Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

काटई परिसरातील लोढा हेवन येथे साई मंदिरात भक्तांचा महापूर

                 ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

डोंबिवली काटई परिसरातील लोढा हेवन येथे साई मंदिरात गुरुपौर्णिमे निमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते. काटई येथील योगीराज ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आले होते.



साई मंदिरात गेली 16 वर्षे अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा करण्यात येत असतो.सदर मंदिरात परिसरातील हजारो  भक्तांची दर्शनासाठी गर्दी उसळते.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर भक्तिभावाचे समाधान दिसत होते. साई बाबांचं दर्शन आपल्याच गावात घडल्या मुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असते.


सदर भक्तीचा उत्सव दरवर्षी साजरा करण्यासाठी काटई गावातील  समस्त ग्रामस्थ आणि माजी सरपंच श्री.काशिनाथ पाटील आणि त्याचे सहकारी कार्यकर्ते विशेष मेहनत घेत असतात.त्यांनाह्या सात्विक कार्यात  माजी. मनसे आमदार राजू (प्रमोद)पाटील यांचे विशेष सहकार्य लाभते.त्या मुळे असा हा नेत्रदीपक भक्तीचा सोहळा नेहमीच उत्सवात पार पडतो.

Post a Comment

0 Comments