ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाचा ठेकेदार सुमित कंपनी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सुमित कंपनीचा डायरेक्टर अमित साळुंखेला झारखंड रांचीमध्ये पोलिसांनी एका घोटाळ्यासंदर्भात अटक केली आहे. केडीएमसीने नियम डावलून सुमित कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिले असून टेंडर दिल्यानंतर सुमित कंपनीची स्थापना केली असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी कल्याण लोकसभा जिल्हा संघटक वैशाली दरेकर, शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे हे उपस्थित होते.पेस्ट कंट्रोल आणि हाऊसकिपिंगचा अनुभव असणाऱ्या ठेकेदाराला केडीएमसीने काम दिलं आहे. भविष्यात काही अडचणी येण्या पेक्षा आताच या कंपनीचा ठेका रद्द करण्याची मागणी यावेळी म्हात्रे यांनी केली. झारखंडला दारू घोटाळ्यात ज्या कंपनीच्या संचालकाला अटक केली त्या कंपनीला केडीएमसीने काम दिले आहे. ठेकेदाराकडून पैसे घेण्यासाठी काम दिल्याचा संशय ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. तर केडीएमसीने ठेका रद्द केला नाहीतर न्यायालयात धाव घेण्याचा इशारा ठाकरे गटाने यावेळी दिला आहे.
Post a Comment
0 Comments