ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण पूर्वेतील प्रभाग ड कार्यालया जवळील भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राच्या आरक्षित भूखंडावर केंद्राला लागूनच एका सामाजिक संस्थेने कच्च्या स्वरूपातील अनधिकृतपणे बांधकाम करून संस्थेचे कार्यालय सुरू केले होते. या अनधिकृत बांधकावर प्रभाग ५ ड चे सहाय्यक आयुक्त उमेश उमगर यांनी अखेर कारवाई करून हा भूखंड गुरुवारी अतिक्रमण मुक्त केला आहे .
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि तद्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने प्रभाग ड कार्यालया शेजारी सुमारे २१ कोटी निधीतून स्मारक निर्माण करण्यात आले आहे. या स्मारकाचे काम चालु असतांना स्मारकाच्या बाजुलाच कामगारांनी रहाण्यासाठी पत्राशेडचा निवारा निर्माण केला होता परंतु स्मारकाचे बांधकाम संपुष्ठात आल्यानंतर कामगार पत्राशेड जैसेथे ठेवून निघून गेले. याच पत्राशेडचा २७ सदस्य असलेल्या 'मॉर्निंग वॉक सामाजिक संस्था ' या संस्थेने अनधिकृतपणे ताबा घेवून आपले कार्यालय सुरु केले होते.
हे पत्राशेड स्मारकाच्या सौंदर्यात बाधा निर्माण करत असल्याने तसेच भविष्यात अशाच प्रकारची स्मारकाच्या अवती भवती अन्य अतिक्रमणे उभी राहू शकतात ही शक्यता असल्याने सामाजिक कार्यकर्ते विनोद तिवारी यांनी या अनधिकृत बांधकामाची महापालिकेकडे लेखी तक्रार करून हे स्मारकासाठी अनावश्यक असलेले पत्रा शेड निष्कासित करून स्मारकाची जागा रिकामी करण्याची तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा करून प्रभाग ५ ड चे सहाय्यक आयुक्त उमेश उमगर यांनी संबंधीत संस्था चालकांना कायदेशीर नोटीस देवून सदरचे अतिक्रमण काढून घेण्याचा आदेश दिला होता. संस्था चालकांनी या नोटीसला अनुसरून कार्यालयातील सर्व सामान काढून घेतल्या नंतर उमेश उमगर यांनी बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसात सदरचे अतिक्रमण निष्कासित करून स्मारकाच्या आरक्षित जागा रिकामी केली आहे.
Post a Comment
0 Comments