Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

एकाच दिवसांत केडीएमसीच्या तीन अधिकाऱ्यांना लाच लुचपत विभागाने केली अटक


                       ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 कल्याण डोंबिवली मनपाच्या आरोग्य विभागातील दोन जणांना तसेच मलनिस्सारण विभागातील एकाला लाच घेतल्या प्रकरणी ठाणे लाचलुचपत विभागाने अटक केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला आहे. यामुळे केडीएमसीला लागलेले लाचखोरीचे ग्रहण सुटता सुटेना असे दिसत आहे. 


घनकचरा विभागातील आरोग्य निरिक्षक वसंत देगलूरकर आणि सहकारी सुर्दशन जाधव या दोघांना आजारी असलेल्या कर्मचाऱ्याकडून परत कामावर रुजू करण्यासाठी 20 हजार रु.लाच घेताना रंगेहाथ पकडले. तर कल्याण डोंबिवली मलनिस्सारण विभागाचे सहाय्यक अभियंता रवींद्र अहिरे यांनी एका विकासाला एनओसी देण्यासाठी 40 हजार रू लाच प्रकरणी अटक केली. कल्याण डोंबिवली मनपाच्या स्थापनेपासून आतापर्यंत सुमारे 47 अधिकारी, कर्मचारी लाच प्रकरणी एसबीच्या जाळ्यात अडकल्याचे पाहता गुरूवारी लाचलुचपत विभागाने लावलेल्या दोन सापळ्यात वेगवेगळ्या दोन विभागातील तीन जणांना अटक केल्याने मनपाचे पुरते वाभाडे निघाले असल्याने हे थांबणार कधी असा सवाल होत आहे.

 

Post a Comment

0 Comments