वालधुनी नदी स्वच्छता संघर्ष समितीची
प्रदूषण महामंडळाकडे मागणी
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
वालधुनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण महामंडळाने काय कामगिरी केली याची माहिती देण्याची मागणी वालधुनि नदी स्वच्छता संघर्ष समितीच्या अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांनी प्रदूषण महामंडळाकडे पत्राद्वारे केली आहे.
वालधुनी नदीमध्ये सध्या वाहत असलेले पाणी हे गटारीपेक्षाही जास्त दूषित आहे. परिसरात याची खूप दुर्गंधी पसरते, तरी या नदीतील पाण्याची प्रदूषण पातळी तपासली आहे का, जर तपासली असेल तर याची ठेवलेली नोंद मिळावी. या नदीच्या किनारी मोठमोठी संकुले उभी आहेत व हजारोच्या संख्येने नागरिक वास्तव्यास आहेत. या दुर्गंधीचा त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. तसेच या वालधुनी नदीचे पाणी पुढे गांधारी येथून खाडीत मिळते व पर्यायाने खाडीचे पाणी देखील दूषित झाले आहे.
तसेच सध्या तयार झालेले संकुल साई निर्वाणा व बिर्ला वन्य, या ठिकाणी आधी फॉरेस्ट जागा होती ती दिसत नाही. तसेच कांदळवन, हरित लवादा व सीआरझेड पट्टा सुद्धा निदर्शनास येत नाही. नदी पात्रात होणारे अतिक्रमण रोखण्याच्या उद्देशाने, ठाणे मुंबई येथे संरक्षित पट्टा तयार करून नदीला जीवनदान देण्याचा शक्यतो प्रयत्न केला जात आहे. तसे कल्याण पश्चिम मधून वाहणारी वालधुनी नदी बाबत विचार करावा. प्रदूषण महामंडळातर्फे वालधुनी नदीची प्रदूषण पातळी दर्जा टिकवण्यासाठी काय प्रयत्न केला आदींची माहिती देण्याची मागणी पुष्पा रत्नपारखी यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments