Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कलासाधना सामाजिक संस्था, नवी मुंबई तर्फे पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

 

                    ब्लॅक अँड व्हाईट मुंबई वार्ताहर 

नवी मुंबई येथील कलासाधना सामाजिक संस्था तर्फे ५ सप्टेंबर  २०२५ रोजी ,शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रस्तरीय परमपूज्य साने गुरुजी  आदर्श शिक्षक पुरस्कार, परमपूज्य साने गुरुजी  समाजभूषण पुरस्कार,  परमपूज्य साने गुरुजी जीवन गौरव  पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. 

       ह्या शेत्रातील व्यक्ती आपला प्रस्ताव पाठवू शकतात, वैयक्तिक, शिक्षण, शिक्षक, प्राध्यापक, खेळ, कला, चित्रपट, चित्रपटगृह, लिटरेचर, राजकारण, सामाजिक, इतिहास, बँकिंग,वित्त. प्रेस, मीडिया, वैद्यकीय, लेखक,कवी,कलाकार, चित्रकार, आरोग्य सेवा  इतर क्षेत्रातील मान्यवर आपले नामांकन  ७२०८१०१५८२या क्रमांकावर पीडीएफ स्वरूपात पाठवण्याचे आवाहन संस्थे मार्फत करण्यात येत आहे. 

     पुरस्कार स्वरूप आकर्षक स्मृतिचिन्ह / सन्मानपत्र / पुस्तक/ आकर्षक मेडल इ.  प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येईल.

 पुरस्कारांसाठी आपले प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन संस्थेमार्फत करण्यात येत आहे. या पुरस्कारांसाठी आपण आपले प्रस्ताव पाठवू शकतात. 

    प्रस्ताव / नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख ३० जुलै २०२५ ही असेल. त्यानंतर येणारा प्रस्ताव / नामांकन पुरस्कारांसाठी विचारात घेतले जाणार नाहीत असे संस्थे तर्फे सांगण्यात येत आहे. नामवंत आणि प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत नवी मुंबई येथे भव्य दिव्य कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येईल.

 पुरस्कारासाठी निवड झालेल्या नंतर त्या बाबत माहिती देण्यात येईल. जास्तीत जास्त मान्यवरांनी या पुरस्कारासाठी आपला अर्ज करावा असे आयोजकांमार्फत आव्हान करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments