Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

विना परवाना गावठी कट्टा आणि पोलिस गणवेश बाळगणाऱ्याला अटक

 

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

विना परवाना गावठी कट्टा आणि पोलिस गणवेश बाळगणाऱ्यास खडकपाडा पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव सनीकुमार विजय पाल उर्फ चौहाण (१९) असे आहे. तो कल्याणच्या मिलिंदनगर परिसरात राहत होता.

खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गौरीपाडा मिलिंदनगर परिसरात एक व्यक्ती पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. खडकपाडा पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय गायकवाड यांनी ३ जुलै रोजी सापळा रचला. त्याठिकाणी एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे नाव सनीकुमार विजय पाल उर्फ चौहाण असे होते. त्याच्याकडे गावठी कट्टा मिळून आला. त्याच्या घरीचा झडती घेतली असता. त्याच्या घरी पोलिसांचे दोन जोडी गणवेश आढळून आले.

 गणवेशासोबत एक स्टारही मिळून आले. त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्या इंस्टाग्रामवर त्याने पोलिसाचा गणवेश घालून हाती गावठी गट्टा घेत एक फोटोही पोस्ट केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरिक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय गायकवाड करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments