ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त सर्व वारकरी पायी किंवा वाहनाने वारीला जात असतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदाय आराध्य दैवत विठू माऊलींच्या विषयी श्रद्धा भावना व्यक्त करण्यासाठी कल्याण मधील वाणी विद्यालय येथील कला शिक्षक यश महाजन हे विविध वस्तू जसे फुलावर, तुळशीच्या, केळीच्या, पिंपळाच्या पानांनवर दगडावर, चित्र व कोरीव काम करून चित्रकृती तयार करीत असतात. यावर्षी त्यांनी मोर पिसावर विठू माऊलीचे चित्र रेखाटून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
Post a Comment
0 Comments