56 हून अधिक देशांतील तीन हजारांहून अधिक नर्तकांना जागतिक खिताब जिंकण्यासाठी आमंत्रण
ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
अमेरिकेची संस्था हिप हॉप इंटरनॅशनल भारतातून प्रतिनिधित्व करणाऱ्या हिप हॉप आणि स्ट्रीट डान्सर्सच्या शिष्टमंडळाला प्रतिवर्षी अधिकृत निमंत्रण देते.
27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 या काळात फीनिक्स, ॲरिझोना येथे होणाऱ्या 23 व्या जागतिक हिप हॉप नृत्य चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी कल्याण पूर्वेकडील झिरो डिग्री क्रू डान्स ॲकॅडमीच्या 10 मुलांनी पात्रता मिळवली आहे.
56 हून अधिक देशांतील तीन हजारांहून अधिक नर्तक जागतिक किताबाच्या संधीसाठी या विश्व चॅम्पियनशिपमध्ये भारत देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्र ठरले आहेत. याआधी इंडियाज गॉट टॅलेंट, मी आहे सुपरस्टार यांसारख्या दूरदर्शन कार्यक्रमांमध्ये या दहा मुलांनी गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळवले आहेत. तसेच ही 10 मुले सहा महिन्यापूर्वी मलेशियात झालेल्या आंतर्राष्ट्रीय डान्स स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकून 2र्या क्रमांकावर आले होते.
2025 च्या जागतिक हिप हॉप नृत्य चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्यासाठी जाणारी 10 मुले, ज्यात सारा सचिन जाधव, हेमांगी सिंग, यश बापू बागुल, यश वैभव नलावडे, निधी गणेश पागेरे, लावण्या सुभाष पाटील, निर्जला सुभाष पाटील, कर्तव्य उपाध्याय, मनोज सुनील पर्वत, अरायना किरण अंकुश व मोहम्मद मोसिन हे ह्या मुलांचे प्रशिक्षक व समन्वयक आहेत ज्यांच्या अथक प्रयत्न मुळे हा अंतरराष्ट्रीय दौरा होणार आहे,
मध्यमवर्गीय परिवारातिल या सर्व मुलाना विश्वविजेता बनण्यासाठी आर्थिकदृष्ट्या मदत करण्याचे आवाहन सुद्धा ह्या मुलांच्या पालकांकडून केले जात आहे.
Post a Comment
0 Comments