Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डोंबिवली शहरात शेकडो ओला आणि उबर चालकांचा बंद

                आमच्यावर केलेल्या अन्यायाकरीत आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत. या आंदोलनात कल्याण-डोंबिवलीतील शेकडो ओला उबेर चालकही सहभागी झाले होते. सरकार आमचे म्हणणे ऐकून आमच्या मागण्या मान्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

                   ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर 

डोंबिवली शहरात सुमारे शेकडो ओला आणि उबर चालकांनी त्यांच्यामागण्यांसाठी बुधवार 16 जुलै रोजी बंद पुकारला. पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओला व उबेर चालकांनी एकत्र येत सरकारवर नाराजी व्यक्त केली.

ओला आणि उबरसारख्या कंपन्यांनी निश्चित केलेले भाडे खूप कमी आहे. त्यामुळे नुकसान होत आहे आणि त्यांचे शोषण होत आहे. चालकांच्या मुख्य मागण्या म्हणजे भाडे वाढवणे, त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि कामाच्या परिस्थितीत सुधारणा करणे आदी त्यांच्या मागण्या असून त्यांनी याद्वारे सरकारचे लक्ष वेधत योग्य पावले उचलण्याचे आवाहनही सरकारला केले आहे.

मुंबईतील ओला आणि उबर चालकांनी 15 जुलै रोजी संप पुकारला होता. कमी भाड्यामुळे त्यांचे उत्पन्न कमी झाले आहे आणि त्यांचे नुकसान होत आहे. कंपन्यांनी कमिशन दर कमी करावा आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करावी अशी त्यांची मागणी आहे. ओला आणि उबर चालकांचे म्हणणे आहे की, 10 किमीच्या प्रवासासाठी त्यांना कमी पैसे मिळतात. ज्यातून इंधन, देखभाल, कमिशन आणि कर वजा केल्यानंतर काहीही शिल्लक राहत नाही.शासकीय नियमा प्रमाणे ठरलेला दर मिळावा या साठी ओला उबेर टॅक्सी चालकांनी स्वेच्छेने बंद पुकारला होता.साडे व्यवसायात दिवसरात्र मेहनत करूनही आम्हाला योग्य मोबदला मिळत नाही.



हा व्यवसाय करतांना आम्ही ईएमआयवर गाडी चालवत आहोत. आता कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न आम्हाला पडला आहे. आमची परिस्थिती अशी आली आहे की आम्ही गाडीचा ईएमआय भरु शकत नाही, मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कंपनीने निवेदन दिले आहे की व्यवस्थित मोबदला देऊ. पण आज ओला-उबेर कंपनीवाले मनमानी करत आमच्यावर अन्याय करत आहेत. सरकारकडे आमची मागणी आहे की आमच्यावर अन्याय होणार नाही याकडे लक्ष द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना देखील आमची विनंती आहे की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा. हा प्रश्न सुटला नाही तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल.



Post a Comment

0 Comments