ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल आणि उप आयुक्त समीर भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली, आय प्रभागातील गुरुचरण शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई सहाय्यक आयुक्त भारत पवार यांच्या पथकाने काल दिवसभरात केली.
या कारवाईमध्ये शासकीय जलकुंभ बांधण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या २२ गुंठे जागेमध्ये अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या तीन खोल्या आणि कंपाउंड वॉल हटविण्यात आले. संबंधित विकासक जगदीश पाटील याच्यावर एमआरटीपी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सार्वजनिक हित लक्षात घेऊन पारदर्शकपणे राबविण्यात आली असून, जलसंचयन प्रकल्पासाठी मार्ग मोकळा झाला आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
.jpg)

Post a Comment
0 Comments