Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बांधकामाच्या ठिकाणी डेंग्युच्या डास अळ्या सापडल्याने केडीएमसी आकाराला 25 हजारांचा दंड

 

केडीएमसी अतिरिक्त आयुक्त हर्षल

गायकवाड यांनी आजही केली प्रभागातील

साफ-सफाईची पाहणी 

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

 केडीएमसी क्षेत्रात डेंग्यूची साथ पसरली असून डेंग्यूमुळे एका तरुणाला जीव देखील गमवावा लागला आहे. यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने डेंग्यू विरोधात चांगलीच कंबर कसली असून अतिरिक्त आयुक्त हे विविध प्रभागात जाऊन पाहणी करत आहेत. या पाहणीत बेतूरकर पाडा येथील डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या तरुणाच्या घराच्या परिसरातील बांधकामाच्या ठिकाणी डेंग्यूच्या डास अळ्या सापडल्याने 25 हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.

सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या साथ रोगाच्या पार्श्वभुमीवर अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी सोमवारी अ  प्रभाग क्षेत्रातील साफ-सफाईची पाहणी केली होती. आजही अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी क प्रभाग क्षेत्रातील गजानन महाराज मंदिर परिसर, साईबाबा नगर, प्रभाग क्र.29 मधील गुलमोहर सोसायटी, सद्गगुरु कृपा कॉलनी, श्री कृष्ण कॉलनी, प्रभाग क्र.28 मधील शकुंतला भवन, खंडेलवाल कॉलनी, क्वालिटी कंपाऊंड व गांवदेवी मंदिर परिसर इ. ठिकाणी समक्ष भेट दिली. यावेळी सुमारे 200 कंटेनरची पाहणी केली असता, 30 कंटेनरमध्ये डासांच्या अळ्या आढळुन आल्या.

अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी संबंधित परिसरातील नागरीकांना पाण्याचा जास्त काळ साठा केल्यामुळे उद्भवणाऱ्या साथरोगांबाबत मार्गदर्शन केले. रोकडे कॉलनी आणि पंचमुखी मारुती मंदिर परिसरातील तीन बांधकामांच्या ठिकाणी डेंग्युच्या डास अळ्या  सापडल्यामुळे महापालिकेकडून रुपये 25 हजार  इतका दंड आकारण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments