Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

साई दरबार फाऊंडेशन, शिर्डी आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 कार्यक्रम संपन्न

 

                    ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 साईदरबार शिर्डी येथे आयोजित करण्यात आला होता.या फाउंडेशन द्वारे ३६ जिल्ह्यातील ३६ शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार 2025 प्रदान करण्यात आला. यात अनेक शिक्षकांची पारदर्शकतेने निवड करण्यात आली. या गौरवशाली कार्यक्रमासाठी राज्य आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटरावजी पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते प्रत्येकाला सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. यात काही मुंबई,पालघर जिल्ह्यातील शिक्षक सहभागी होते. त्यातील डॉ. विजय वाघेला, मधुकर सर, ज्योती किरण सनाये, नॅन्सी स्वामी, वैभव कोठारी, विलमा मॅडम, वंदना मॅडम, सोनाली भालेकर, निशा मांजरेकर, किशोर पांचाळ, जुईली पाटील, सतीश मिश्रा, परवीन सय्यद, ऍलेक्स फिलिप, रेखा प्रभू, खान अब्दुल रहमान इरफान, समृद्धी मोरे, अंजना मिश्रा, स्मिता पाडगावकर, डॉ. साक्षी आशिष भोईटे, सुजाता सूर्यवंशी, रुचिका कपाडिया, दर्शना पारेख, काजल सुर्वे, अशा अनेक उत्तुंग शिक्षकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments