ब्लॅक अँड व्हाईट डोंबिवली वार्ताहर
भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली आणि भाजपा प्रदेश अध्यक्ष मा.रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली ग्रामीण भागात दिवसेंदिवस शेकडो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करीत आहेत.त्याचा अनुषंगाने वारकरी संप्रायातील अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी भाजपा जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांच्या उपस्थितीत डोंबिवली ग्रामीण मंडळ कार्यालयात जाहीर रित्या भाजपत प्रवेश केला.अनेक महिलांनी स्वयं स्फूर्तीने भाजपात प्रवेश करून आली संस्कृती व आपल्या राष्ट्रासाठी काम करण्याची तयारी दर्शविली.
सदर प्रवेश प्रसंगी शेकडो महिला पुरुष उपस्थित होते.जिल्हा अध्यक्ष नंदू परब यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानून आल्या देशासाठी,आपल्या महाराष्ट्रसाठी विकासाला चालना देणारे भाजप सरकार आणखी मजबूत करण्यासाठी, राज्याचे प्रदेश अध्यक्ष मा. रविंद्र चव्हाण यांच्या विकासात्मक कार्याला पाठिंबा देणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आणण्याचे काम घडत आहे.
येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मधील ही इन्कामिंग प्रक्रिया या पुढेही अशीच सुरू राहणार असल्याचे दिसून येत आहे.
.jpg)








Post a Comment
0 Comments