ब्लॅक अँड व्हाईट अंबरनाथ वार्ताहर
अंबरनाथ शहरात पूर्व व पश्चिम विभागात आनंदनगर , चिखलोली,मोरिवली वडोज गाव इत्यादी औद्योगिक क्षेत्र असून सर्व एमआयडीसी कंपन्यांमध्ये आस्थापना कचरा नियमित संकलन करणे बाबत नगरपरिषदेला वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने माननीय मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या दालनात एमआयडीसी कंपन्यांमधील घनकचरा व्यवस्थापन कचरा ( घातक कचरा आणि कंपनीतून तयार होणारा रॉ मटेरियल कचरा सोडून )उचलणे कामे चर्चा झाली. त्यानुसार अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील एमआयडीसी मधील कंपनीचा आस्थापनाचा घनकचरा संकलनाचे काम आरोग्य विभागामार्फत दिनांक 18/07/ 2025 पासून सुरू करण्यात आलेले आहे. यामुळे एमआयडीसी मधील परिसर स्वच्छ राहील व रोगराईला आळा बसेल.
.jpg)

Post a Comment
0 Comments