Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडतर्फे क्षयरोगी रुग्णांना पोषण किट वाटप

 

                   ब्लॅक अँड व्हाईट कल्याण वार्ताहर 

रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईड, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोगी रुग्णांसाठी पोषण किट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "टीबी मुक्त भारत अभियान" व "निक्षय मित्र योजना" अंतर्गत राबविण्यात आला.

क्षयरोग हा गंभीर आणि जीवघेणा आजार असून कुपोषण व अशक्तपणामुळे तो अधिक घातक ठरतो. त्यामुळे योग्य आणि संतुलित आहार अत्यावश्यक असतो. हे लक्षात घेऊन, रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडने 145 क्षयरोगी रुग्णांना पोषणयुक्त अन्नधान्य किट्स वाटप केल्या. या किट्समध्ये गहू पीठ, विविध डाळी, सोयाबीन आणि खाद्यतेल यांचा समावेश होता – जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि पुनर्प्राप्तीला गती देण्यासाठी उपयुक्त आहेत.

पोषण किट्समध्ये अत्यावश्यक पोषक घटकांचा समावेश करून रुग्णांची अशक्तपणा दूर करण्यास मदत केली. रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडने पुढील एक वर्षासाठी दरमहा पोषण किट्स वाटप करण्याचा संकल्प केला आहे. हा उपक्रम आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे आयोजित करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3142 चे गव्हर्नर रोटेरियन हर्ष मकोल यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यांनी आपल्या भाषणात टीबी मुक्त भारत अभियान व निक्षय मित्र योजना यांचे उद्दिष्ट स्पष्ट केले आणि रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईडच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक केले.

कार्यक्रमाला डिस्ट्रिक्ट गव्हर्नर हर्ष मकोल, समीर सारंगधर, क्लब अध्यक्ष रोटेरियन महेश तिबे, सचिव संजय माचवे, प्रकल्प प्रमुख रोटेरियन डॉ. अनंत इतकर, डॉ. अवधूत शेट्ये, वैभव ठाकरे, योगेश कल्हापुरे, नरेश पटेल, डॉ. आशीष जैन आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. रोटरी क्लब ठाणे प्रीमियम, केडीएमसी व रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हरसाईड यांची संयुक्त भागीदारी या यशस्वी उपक्रमाचा प्रमुख आधार ठरली.


Post a Comment

0 Comments